मराठा आरक्षण : मराठा आरक्षण Maratha Reservation हा विषय 23 डिसेंबर ही तारीख जसजशी जवळ येते आहे तसा तापत चालला आहे. कारण जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 23 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे. दरम्यान मराठा आरक्षणाला विरोध असलेले मंत्री छगन भुजबळ Minister Chhagan Bhujbal आणि आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांच्यावर शाब्दिक वार-प्रतिवार सुरूचं आहेत.
मराठा समाजाला दोष देत नाही, पण काहींची झुंडशाही सुरू आहे !
यावेळी पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण याबाबत आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. ते म्हणाले की, एकदा ओबीसीमध्ये आले की शैक्षणिक आणि राजकीय आरक्षण लागू होणार. ओबीसीमध्ये आलात तर सर्व लाभ देखील मिळतील त्यामुळे नाही म्हटले तरी ओबीसी आरक्षणाला धक्का बसणारच आहे. सरसकट प्रमाणपत्र दिले म्हणजे ओबीसीमध्ये आले. त्यामुळे बहुतांश लोक मलाच दोषी धरत आहेत. मी पूर्ण मराठा समाजाला दोष देत नाही, पण काहींची झुंडशाही सुरू आहे. दादागिरी करत आहेत. त्यांच्या विरोधात मी आहे. अशी आपली भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली आहे.
दरम्यान छगन भुजबळांच्या मराठा आरक्षण विरोधी भूमिकेमुळे मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यामध्ये सातत्याने शाब्दिक चकमक सुरूच आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना छगन भुजबळ म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लोकप्रतिनिधींना गावबंदी करणे हा गुन्हा आहे. त्याला एक महिना शिक्षा झाली पाहिजे. तसेच मराठा आंदोलक मनोज जरांगे हे सरकारला मराठा आरक्षण या तारखेपर्यंत द्या त्या तारखेपर्यंत द्या असे म्हणतात. म्हणजेच ब्लॅकमेलिंग नाही तर आणखी काय आहे ? सरकारने तीन न्यायाधीश बसवले आहेत. वाट पहा ! असा खोचक टोला देखील भुजबळांनी जरांगे पाटलांना लगावला आहे. तसेच मी अनेक मोठे मोठे लोक अंगावर घेतले आहेत… तू किस झाड की पत्ती आहे ? असा देखील प्रतिहल्ला त्यांनी जरांगे पाटलांवर केला आहे.