आळंदी : आळंदीमध्ये Alandi आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरासमोर बऱ्याच वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरासमोर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन करून आळंदी बंदची हाक दिली होती.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना निर्माण होण्यासाठी निमित्त झालं ते माजी नगराध्यक्ष यांचे पती अशोक उमरगेकर यांचं वक्तव्य…. अशोक उमरगेकर म्हणाले की, सर्व मंदिर ही केंद्रांतर्गत येतात…! त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. आणि त्यामुळे त्यांना बोलण्यास मज्जाव करण्यात आला. यानंतर आळंदी बंदची हाक देण्यात आली. बराच वेळ परिसरात असंतोषाचे वातावरण होतं. परंतु उपस्थित आणि केलेल्या मध्यस्थीने हा वाद वेळेत शमला आहे.
दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यावर आळंदी बंदची टांगती तलवार आहे. परंतु यामुळे लाखो वारकऱ्यांची ओढाताण होणार हे नक्की !त्यामुळे विश्वस्त पदासाठी वारकऱ्यांना वेठीस धरण योग्य नाही हे माऊलींना देखील आवडलं नसतं अशी भावना वारकऱ्यांमधून देखील व्यक्त होतीये.