दुबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi गुरुवारी रात्री उशिरा संयुक्त अरब अमिरातीची राजधानी दुबईत दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाने त्यांचे जल्लोषात स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सीओपी-28 COP 28 Summit च्या जागतिक हवामान परिषदेत भाग घेतला आहे. यावेळी जगभरातील अनेक नेत्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधला आहे.
सर्वांच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता – पंतप्रधान मोदी
“सर्वप्रथम, मी हवामान न्याय, हवामान वित्त आणि हरित पत यासारख्या मुद्द्यांवर आपल्या सतत पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. अशी भावना व्यक्त केली.
भारतासोबत आमचे चांगले संबंध : श्रीलंकेचे राजदूत
सीओपी-28 परिषदेत संयुक्त अरब अमिरातीतील श्रीलंकेचे राजदूत उदय इंद्ररत्न म्हणाले की, ” संयुक्त अरब अमिराती एक खूप मोठी आणि महत्वाची सीओपी -28 स्पर्धा आयोजित करत आहे. हे खूप यशस्वी होणार आहे. भारताचे पंतप्रधान आणि आमचे राष्ट्रपतीही या शहरात आहेत. याचा आम्हाला खूप आनंद आहे. भारतासोबत आमचे चांगले संबंध आहेत, ते आमचे मोठे शेजारी आहेत. एकत्र राहण्यासाठी हा खूप चांगला काळ आहे.”असे प्रतिपादन संयुक्त अरब अमिरातीतील श्रीलंकेचे राजदूत उदय इंद्ररत्न यांनी केले.
पंतप्रधान मोदींनी घेतली बहरीनच्या पंतप्रधानांची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहरीनचे राजे हमाद बिन इसा अल खलिफा यांची भेट घेतली.
शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांना भेटण्याची संधी मिळाली. विविध विषयांवरील त्यांचे दूरदर्शी नेतृत्व खरोखरच कौतुकास्पद आहे.असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे.
पंतप्रधान मोदींनी घेतली उझबेकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांची भेट
सीओपी २८ मध्ये जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांना भेटून आनंद होत आहे. आमची चर्चा समृद्ध होती आणि आमच्या देशांच्या खोल मैत्रीचे प्रतिबिंब होते. आमचे नाते अधिक दृढ करण्यासाठी मी उत्सुक आहे. ‘ असे मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे
पंतप्रधान मोदी ंनी घेतली नेदरलँड्सच्या पंतप्रधानांची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीतील दुबईत नेदरलँड्सचे पंतप्रधान मार्क रूट यांची भेट घेतली.
नेदरलँड्समधील माझा मित्र मार्क रुट याच्याशी विचारांची देवाणघेवाण करणे नेहमीच ताजेतवाने असते. “असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.