बोरिवली : महाराष्ट्रात सायबर क्राईम Cyber Crime आणि बनावट विक्रेता असे अनेक फसवे मार्ग तयार करून विशेषकरून वृद्धांना गंडा घालण्याचे प्रकार दिवसेंदीव वाढतच चालले आहेत. बोरिवलीमध्ये Boriwali Crime News देखील अशीच एक मोठी घटना उघडकीस अली आहे. बोरीवली येथील 63 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून कस्तुरबा मार्ग पोलिसांनी बनावट डॉक्टरांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी राहुल बजाज, डॉक्टर पटेल व त्यांचा सहाय्यक इम्रान यांच्याविरोधात कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडाळ्यातील पिडीत तक्रारदार राजेश पाटील यांना ट्रेमर या आजारावर खात्रीशीर उपचार करून त्यांना तात्काळ बरे करण्याचे आमीष या टोळीने दाखवले होते. त्यानंतर पाटील यांच्या वडाळा येथील निवासस्थानी येऊन आरोपी पटेल व त्याचे सहाय्यकाने तपासणी केली.
त्यावेळी पित्तामुळे त्यांच्या शरीरातील नसा दबल्याचे सांगून, त्यामुळेच पिडीत तक्रारदाराचे दोन्ही हात थरथरत असल्याचे सांगितले. त्यानंतर उपचार करत असल्याचं भासवून त्यांच्याकडून 14.50 लाख रुपये उकळले होते.
हे वाचलेत का ? Nawaz Sharif : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची इस्लामाबाद उच्च न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता
नुकतीच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वडाळ्यातील एका व्यक्तीची फसवणूक केल्याप्रकरणी बनावट डॉक्टरांच्या टोळीला अटक केली होती. मोहम्मद शेरु शेख मकसुद खॉ उर्फ डॉ. आर. पटेल , मोहम्मद नफीस मोहम्मद शरीफ , मोहम्मद आसिफ मोह. निसार व मोहम्मद अशिफ मोह. शरीफ अशी अटक आरोपींची नावे आहेत.