Vodafone Idea : देशातील तिसऱ्या सर्वात मोठ्या टेलीकॉम कंपनी वोडाफोन आयडियानं अद्याप ५जी सर्व्हिस लाँच न केल्यामुळे ग्राहक नाराज आहेत. परंतु दुसरीकडे कंपनीनं आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी एकापाठोपाठ एक नवीन रिचार्ज प्लॅन्स सादर केले आहेत. जर तुम्ही देखील वोडाफोन आयडिया युजर्स असाल तर कंपनीनं तुमच्यासाठी रिचार्ज प्लॅन्सच्या पोर्टफोलियो मध्ये एक नवीन प्लॅन जोडला आहे. VI नं २३ रुपयांचा नवीन रिचार्ज आणला आहे. (Vodafone Idea Vi 23 rupees Introduces New Prepaid Plans in India | Beebom tech news)
Vi चा २३ रुपयांचा प्लॅन
VI चा नवीन प्रीपेड पॅक एक डेटा व्हाउचर आहे. ह्यात कंपनी ग्राहकांना १.२ जीबी डेटा देत आहे. जर तुमच्याकडे एक सक्रिय रिचार्ज प्लॅन असेल आणि अचानक प्लॅनमधील डेली डेटा संपला तर VI चा २३ रुपयांचा प्लॅन अतिरिक्त डेटा देतो. डेटा व्यतिरिक्त ह्या प्लॅनमध्ये कॉलिंग, एसएमएस किंवा इतर कोणत्याही सर्व्हिसचे बेनिफिट देण्यात आले नाहीत.
आणखी वाचा – Marathi signboards : बीएमसी अॅक्शन मोडमध्ये! मराठी पाट्या लावल्या नाही तर होणार कारवाई
या प्लॅनची वैधता तुमच्या मुख्य प्लॅनच्या वैधतेवर अवलंबून असेल. म्हणजे तुम्ही ह्या प्लॅनमध्ये मिळणारा डेटा तोपर्यंत वापरता येईल जोपर्यंत हा डेटा संपत नाही किंवा तुमच्या सक्रिय प्लॅनची वैधता संपत नाही. ह्या नव्या डेटा व्हाउचरला मात्र वैधता नाही. जर तुम्ही तुमच्या फोनमध्ये इंटरनेट जास्त वापरत असाल तर ह्या प्लॅनमुळे डेली डेटा लिमिट संपण्याची भीती बाळगण्याची गरज नाही. ह्या प्लॅन व्यतिरिक्त कंपनीकडे आणखी अनेक छोटे डेटा पॅक आहेत.
वोडाफोन आयडियाचा २४ आणि २५ रुपयांचा प्लॅन
वोडाफोन आयडियाच्या लिस्टमध्ये २३ रुपयांच्या आसपास आणखी दोन डेटा प्लॅन्स आहेत. ज्यांची किंमत २४ रुपये आणि २५ रुपये आहे. विआयचा २४ रुपयांचा प्लॅन फक्त एक तासांच्या व्हॅलिडिटीसह येतो परंतु ह्या एक तासात तुम्ही अनलिमिटेड डेटा वापरू शकता. तसेच २५ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना एक दिवसाच्या व्हॅलिडिटीसह १.१जीबी डेटा मिळतो.