मुंबई : महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणीवर भर देण्यासाठी शिवसेनेने Shivsena आज विभागीय नेत्यांची यादी जाहीर केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackrey यांनी शिवसेनेच्या दहा नेत्यांवर राज्यातील विभागवार संघटनात्मक तसेच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने विशेष जबाबदारी सोपवली आहे.
कोणत्या नेत्याकडे कुठली जबाबदारी ?
संजय राऊत : उत्तर महाराष्ट्र आणि पुणे
▪️लोकसभा मतदारसंघ : नाशिक, दिंडोरी, जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार, नगर, शिडीं, पुणे, बारामती, शिरूर, मावळ (विधानसभा पिंपरी, चिंचवड, मावळ)
अनंत गीते : कोकण (रायगड)
▪️लोकसभा मतदारसंघ : रायगड, मावळ (विधानसभा – पनवेल, कर्जत, उरण)
चंद्रकांत खैरे : मराठवाडा
▪️लोकसभा मतदारसंघ : संभाजीनगर, जालना
खासदार अरविंद सावंत : पश्चिम विदर्भ
▪️लोकसभा मतदारसंघ : बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, वर्धा
खासदार अनिल देसाई : पश्चिम महाराष्ट्र
▪️लोकसभा मतदारसंघ : सातारा, माढा, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी
आमदार भास्कर जाधव : पूर्व विदर्भ
▪️लोकसभा मतदारसंघ : नागपूर, रामटेक, भंडारा- गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, चिमूर
खासदार विनायक राऊत : कोकण (रत्नागिरी, सिंधुदुर्ग)
▪️लोकसभा मतदारसंघ : रत्नागिरी, सिंधुदुर्ग
खासदार राजन विचारे : कोकण (ठाणे, पालघर)
▪️लोकसभा मतदारसंघ : ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर
आमदार रवींद्र वायकर : मराठवाडा
▪️लोकसभा मतदारसंघ: नांदेड, हिंगोली, परभणी
आमदार सुनील प्रभू : मराठवाडा, सोलापूर
▪️लोकसभा मतदारसंघ: सोलापूर ,धाराशिव, लातूर, बीड