जालना : अंतरवली सराटी Antarwali Sarati येथील उपोषण स्थळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये Jalna Police झालेल्या दगफेकीनंतर लाठीचार्ग केल्याची घटना घडली होती. दरम्यान, या प्रकरणी आरोपी ऋषिकेश बेदरे याच्यासह सनी सिरसट, कैलास सुरवसे यांना जालन्यातील अंबड पोलिसांनी अटक केली आहे. तर, या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना तिघा जणांना 2 डिसेंबरपर्यंत न्यायालीन कोठडी सुनावली आहे.
जालन्यातील अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु असतांना पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या वादाने रौद्र रूप घेतले. यानंतर काही जणांनी दगडफेक केली होती म्हणून पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. या प्रकरणी जालन्यातील गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे आरोपी बेदरे कडून एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे.