POLITICAL NEWS : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पराभवावरून काँग्रेस नेते राहुल गांधी Rahul Gandhi यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, या पराभवासाठी पंतप्रधान मोदींना जबाबदार धरल्यानंतर लगेचच भारतीय जनता पक्षाचे खासदार रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींसाठी वापरलेल्या अपशब्दांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याबद्दल काँग्रेस नेत्याने माफी मागावी, अशी मागणी रविशंकर प्रसाद यांनी केली आहे.
हे वाचलेत का ? Rahul Gandhi : ‘पनवती’ नं हरवलं! राहुल गांधीचे ‘ते’ विधान चर्चेत
ते म्हणाले की, तुम्ही देशाच्या पंतप्रधानांसाठी असे शब्द वापरत आहात. या वक्तव्याबद्दल माफी मागावी. काँग्रेस नेत्याला भूतकाळातून धडा घेण्याचा सल्ला देताना ते म्हणाले, ‘तुम्हाला भूतकाळातून शिकण्याची गरज आहे. तुमची आई सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदींसाठी ‘मृत्यूचा व्यापारी’ हा शब्द वापरला होता. आता काँग्रेस आज कुठे आहे ते पाहा. असा टोला देखील त्यांनी लागावला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बाडमेरमध्ये एका सभेला संबोधित करताना विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील उपस्थितीबद्दल पंतप्रधान मोदींवर वादग्रस्त विधान केले. यावरून भाजप नेते आता आक्रमक झाले आहेत.