मुंबई : BJP भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) मकाऊमध्ये कसिनो खेळत असा एक फोटो खासदार संजय राऊत यांनी एक्सवर शेअर करून प्रश्न उपस्थित केले आहेत. हा फोटो गंभीर असून याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे कधीच जुगार खेळलेले नाहीत असे स्पष्टीकरण महाराष्ट्र भाजपाने (Maharastra BJP) दिले आहे.
दरम्यान संजय राऊत आपल्या ट्वीटमध्ये (Sanjay Raut Tweet) म्हणाले कि, 19 नोव्हेंबर मध्यरात्री मुक्काम पोस्ट मकाऊ,veneshine. साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत खेळले तर बिघडले कोठे ? ते तेच आहेत ना ? ते म्हणतात फॅमिलीसह मकाऊला गेले आहेत. त्यांच्या सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का ? ते म्हणतात कधीच जुगार खेळले नाहीत. मग ते नक्की काय करत आहेत ? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल, झाला तेवढा तमाशा पुरेसा आहे. अशा शब्दात संजय राऊत यांनी खडसावले आहे.
तर संजय राऊतांच्या ट्वीटला भाजपने देखील एक फोटो शेअर करून उत्तर दिले आहे. भाजपने आदित्य ठाकरेंचा एका पार्टीतील फोटो ट्वीट केला आहे. आणि संजय राऊतांना आदित्य ठाकरेंच्या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हीस्की आहे, असा प्रश्न उपस्थित केल आहे. भाजपने कॅप्शनमध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर आहे. असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलीकडे जाऊ शकत नाही. असे ट्विट भाजपने केले आहे.
हे वाचलेत का ? PRIZE MONEY : विश्वचषकात ICC तर्फे प्रत्येक संघाला मिळाले इतक्या कोटीचे बक्षिस; कमाई वाचून तुम्हीही व्हाल चकित