मुंबई : भारत विश्वचषक हरला ! हे दुःख पचवणं कोणत्याही भारतीयाला शक्य नाही. खरंतर १० सामने प्रचंड ताकतीने जिंकल्यानंतर मैदानावर भारतीय संघ तुफानासारखा गरजेला असे वाटत असताना कालची संघाची कामगिरी नाराज करणारी ठरली. यावर आता सर्वच स्तरातून चांगली वाईट टीका टिपणी होत असताना संजय राऊत यांनी भारताच्या या अपयशाचे खापर थेट भाजपवर फोडला आहे. मुंबईत संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले कि, “भारतीय संघ हरला (Team India World Cup) ते दुःख सर्वांना झाले आहे. या देशांमध्ये खिलाडूवृत्ती आहे. आणि खेळांमध्ये हारजीत होत असते. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi stadium Gujrat) भारताचा पराभव झाला आहे. अंतिम सामने दिल्लीत होतात किंवा मुंबईतील वानखेडे मैदानात (Wankhede Stadium Mumbai) होतात. मात्र यावेळेला क्रिकेटमध्ये राजकीय लॉबी घुसली. त्यांनी वल्लभाई पटेल स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम ठेवले. भाजप (BJP) सर्व श्रेय आपल्याकडे घेण्याचा विचार करत होता”, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut Shiv Sena) यांनी केला.
हे वाचलेत का ? PRIZE MONEY : विश्वचषकात ICC तर्फे प्रत्येक संघाला मिळाले इतक्या कोटीचे बक्षिस; कमाई वाचून तुम्हीही व्हाल चकित
हा सामना म्हणजे भारत विरुध्द ऑस्ट्रेलियानसून भाजप विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना होता. जिंकला तर भारतीय जनता पक्ष आता हरलात ना ? भारत संघ उत्तम खेळला, हरले असले तरी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. दुःखात आपण देखील सामील झाले पाहिजे. ही संघावर व्यक्तिगत टीका टीपण्णी करत नाही. वर्ल्ड कप जिंकला असता तर देशाला आनंद झाला असता .मात्र ज्या पद्धतीने राजकारण निकालानंतरची व्यवस्था करण्यात आली होती, भारतीय जनता पक्ष दुर्दैवाने पाणी त्याच्यावरती फिरले, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला.
हे वाचलेत का ? CRIME NEWS : मेट्रोच्या साइटवर एका बेवारस सूटकेसमध्ये सापडला महिलेचा मृतदेह; कुर्ल्यात खळबळ
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेट्स राखून पराभव (India vs Australia world cup final) केला. फलंदाजी करताना भारताने सर्व बाद 240 धावांपर्यंत मजल मारली होती. भारताचं हे आव्हान ऑस्ट्रेलियाने सहज पार केलं. विश्वचषकाची फायनल गुजरातच्या अहमदाबादमध्ये खेळवण्यात आली. या सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) उपस्थित होते.