World Cup 2023 Final : India vs Australia भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत २४० धावांवर ऑलआऊट झाला आहे. भारताकडून केएल राहुलने (६६) सर्वाधिक धावा केल्या. याशिवाय विराट कोहलीने 54 धावांची खेळी केली. तर कर्णधार रोहित शर्माने 47 धावांची खेळी केली. या सामन्यात शुभमन गिल, श्रेयस अय्यर ४-४ धावांवर बाद झाले. तर कुलदीप यादव डावाच्या शेवटच्या चेंडूवर रन आऊट झाला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने 3, पॅट कमिन्स-जोश हेजलवूडने 2 तर ग्लेन मॅक्सवेल आणि अॅडम झम्पा यांनी 1-1 विकेट घेतली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 2023 च्या विश्वचषकाचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. आयसीसी विश्वचषक 2023 (फायनल) मध्ये भारत आतापर्यंत अपराजित राहिला आहे. तर ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने गमावले आहेत. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
इनिंग ब्रेकदरम्यान गीत-संगीताचा रंगीत कार्यक्रम झाला. संगीतकार प्रीतम यांच्यासमवेत ५०० नर्तकांनी सादरीकरण केले.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया प्लेइंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया : ट्रेव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश एंगलिस, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, अॅडम झम्पा, जोश हेजलवूड.