World Men’s Day : वर्षातील ३६५ दिवसांपैकी प्रत्येक दिवसाचे काहींना काहीतरी महत्व आहे आणि म्हणूनच प्रत्येक दिवस कुठेना कुठे कोणत्या ना कोणत्या कारणासाठी साजरा होत असतो. याची काही उदाहरणं द्याची झाली तर mother’s day,father’s day,valintine day,friendeship day,women’s day,आणि असे अजून बरेच दिवस आहेत जे साजरे केले जातात. हे आपल्या सगळ्यांच माहिती आहे. मात्र जागतिक पुरुष दिन कधी साजरा केला जातो अस जर कुणी आपल्याला विचारले तर आपल्याला त्यावर खूप विचार करावा लागेल किंवा असा दिवस साजरा केला जातो. असाही प्रश्न काही जणांना पडतो. तर जगभरातील ८० पेक्षा जास्त दरवर्षी १९ नोव्हेंबरला ‘जागतिक पुरुष दिवस’ साजरा केला जातो.पण हा दिवस नक्की का साजरा केला जातो व या दिवसाचे महत्त्व काय आहे यामागचा इतिहास जाणून घेऊ तसेच या दिवसाची यंदाची थीम कोणती आहे हे बघू…
खरतर समाजातील महिलांचे महत्त्व आणि त्यांच्याशी संबंधित समस्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी ८ मार्चला जसा ‘जागतीक महिला दिन’ साजरा केला जातो.तसचं पुरुषांचे योगदान व त्यांच्या कामगिरीबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी १९ नोव्हेंबरला ‘जागतिक पुरुष दिवस’ साजरा केला जातो.कारण आपल्या समाजात महिला आणि पुरुष दोघांचंही स्वतंत्र असे महत्त्व आहे त्यामुळे दोघांशिवाय हे जग अपूर्ण आहे.
परंतु जितके महत्व जागतिक महिला दिवसाला दिले जाते तितक महत्व जागतिक पुरुष दिवसाला नसल्याने बऱ्याच जणांना या दिवसाचे महत्व माहीत नसते.आणि याच कारण म्हणजे आपल्या समाजात केवळ महिलांवरचं अत्याचार होतो असे वारंवार सांगितले जाते अर्थात हे सत्य आहे पण आपण जर आपल्या आजू बाजूला बघतीले तर समाजात आपल्याला अनेक पीडित पुरुषही दिसतील ज्यांना शोषण,पक्षपात,हिंसा,असमानता या सगळ्याची झळ बसत असते.आणि त्यामुळेच या पुरुषांचे मानसिक आरोग्य आणि त्यांच्यातील सकारात्मक गुणाचे कौतुक करून त्यांना समाजातील मुख्य प्रवाहात आणणे हा आंतर राष्ट्रिय पुरुष दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतू आहे.
आता बघू या दिवसाचा इतिहास काय आहे ?
जसा आंतरराष्ट्रिय महिला दिवस साजरा केला जातो तसचं दिवस पुरुषासाठी ही असावा अशी मागणी १९२३ मध्ये काही पुरुषांनी पहिल्यांदा केली होती परंतु या मागणीवर काहीच विचार झाला नाही यानंतर १९६७ मध्ये अमिरिकेतील प्रसिद्ध पत्रकार जॉन पी हॅरिस यांनी या विषयावर एक लेख लिहिला ज्यात त्यांनी सोव्हिएत युनियन मधल्या व्यवस्थेतील संतुलनाच्या अभवावर प्रकाश टाकला व ही व्यवस्था केवळ महिलासाठी दिवस साजरा करते परंतु पुरुषासाठी कोणताही दिवस साजरा करत नाही असे मत त्यांनी मांडले.त्यानंतर अमेरिकेतील मिसौर यूनिवर्सिटीचे प्रोफेसर थॉमस योस्टर यांच्या प्रयत्नाने सुरुवातीला जागतिक पुरुष दिवसाची संकल्पना पुढे आली आणि 7 फेब्रुवारी 1992 सालापासून अमेरिका, कॅनडा आणि युरोपीयन भागात पुरुष दिवस साजरा करायला सुरुवात झाली.पुढे नोव्हेंबर १९९९ मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील वेस्ट इंडीज विद्यापीठातील इतिहासाचे अभ्यासक डॉ. जेरोम तेलुक्सिंग यांनी या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन या दिवसाला पुनरुज्जीवित केले आणि स्वतःच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त १९ नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पुरुष दिवसाचे आयोजन करण्याचे ठरवले आणि प्रथम आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा केला तसेच प्रत्येकाला या दिवसाचा उपयोग पुरुष आणि मुलांशी संबंधित समस्या मांडण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे नागरिकांनीही आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.
अशाप्रकारे समाजात सकारात्मक बदल करून पुरुषांना भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल जागरुकता निर्माण करून पुरुषांच्या कल्याणासाठी केलेल्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी जगभरात दरवर्षी १९ नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली तर यूनेस्कोने देखील जागतिक पुरुष दिनाचं महत्त्व जाणून त्याचं कौतुक केलं.
आता बघू भारतात हा दिवस नक्की कधी पासून साजरा केला जातो ?
तर भारतामध्ये 2007 साली पुरुषांच्या अधिकारांसाठी काम करणाऱ्या Save Indian Family या संस्थेने पहिल्या International Men`s Day सेलिब्रशन केलं होतं.त्यानंतर ‘ऑल इंडिया मेन्स वेल्फेयर एसोसिएशन’ने भारत सरकारकडे महिलांप्रमाणेच पुरुषांच्या विकासासाठीदेखील विशेष मंत्रालय सुरु करण्याची मागणी केली होती.तर मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की भारतात पुरुष दिवस साजरा करण्यास २००७ मध्ये हैदराबादच्या लेखिका उमा चल्ला यांनी पुढाकार घेत हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. खरंतर हे ऐकून आश्चर्य वाटेल की,आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाची सुरुवातही एका महिलेने केली होती.
तर या वर्षीची जागतिक पुरुष दिवसाची थीम आहे
शून्य पुरुष आत्महत्या. खरतर कुटुंबाचा पोशिंदा,आधार अशी बिरुदे लावणाऱ्या पुरुषांकडून नेहमीच खंबीरपणाची अपेक्षा ठेवली जाते त्यामुळे पुरुषांची जबाबदारी कर्तव्यांबाबत नेहमीच चर्चा होते. मात्र,पुरुषांच्या अधिकाराबाबत फारसे बोलले जात नाही.त्यामुळे जागतिक पुरुष दिवस हा पुरुषांच्या ओळखीच्या सकारात्मक पैलूंवर काम करतो.आणि या सर्व गोष्टींबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठीच हा दिवस साजरा केला जातो.