Delisle Bridge Inauguration : आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी (१६ नोव्हेंबर २०२३) रात्री लोअर परळ येथील उड्डाणपुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे उद्घाटन (Delisle Bridge Inauguration) केले. यावेळी त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मात्र, यानंतर शुक्रवारी मध्यरात्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), सुनील शिंदे (Sunil Shinde) आणि सचिन अहिर (Sachin Ahir) यांच्याविरुद्ध शुक्रवारी मध्यरात्री एनएम जोशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शासकीय कामात अडथळा आणणे आणि जमाव जमवणे या कलमांच्या खाली गुन्हा दाखल करण्यात आला. (Delisle Bridge Inauguration fir filed against three leaders of thackeray group including aditya thackeray)
आदित्य ठाकरे यांनी बेकायदेशीर जमाव जमवून मुंबईतील लोअर परळ येथील उड्डाणपुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे उद्घाटन केले. मात्र, दुसऱ्या मार्गिकेची चाचणी झाली नसतानाही आदित्य ठाकरे यांनी उद्घाटन केल्याचे मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी आदित्य ठाकरेविरोधात आयपीसीच्या कलम १४३, १४९, ३२६ आणि ४४७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा – PM Modi Deepfake video Viral : आता रश्मिकाच्या मागोमाग नरेंद्र मोदींचा देखील डीपफेक व्हिडीओ व्हायरल
मुंबई पोलिसांच्या हवालाने ‘एएनआय’ने पुढे सांगितलं की, लोअर परळमधील डेलिसल ब्रिज परवानगीशिवाय उघडल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पुलाचे काम अद्याप बाकी असताना १६ नोव्हेंबर रोजी आदित्य ठाकरे आणि इतर काही नेत्यांनी या पुलाचे उद्घाटन केलं आहे. याप्रकरणी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर ठाकरे गटाच्या तीन नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेने साधारणपणे सात दिवसानंतर या उड्डाणपुलाचे काम पूर्ण करून लेन सुरू करण्याचे नियोजन केले. मात्र, ठाकरे गटाने अशाप्रकारे उद्घाटन करणे बेकायदेशीर असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने ठाकरे गटाचे नेते तसेच पदाधिकारी आक्रमक होण्याची शक्यता आहे.