मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray यांचा आज अकरावा स्मृतिदिन आहे. बाळासाहेंबाना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्कवर Shivaji Park दाखल झाले आहेत. त्याचबरोबर अनेक राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अभिवादन केल आहे. विशेष म्हणजे भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिदनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे कि, मातोश्री बंगला जनतेसाठी खुला करण्यात यावा. बाळासाहेब ज्या मातोश्री बंगल्यामध्ये अनेक वर्ष राहिले ,तो बंगला जिवंत स्मारक म्हणून जनतेसाठी खुला करावा अशी मागणी राम कदम केली आहे.
हे वाचलेत का ? MAHARASHTRA POLITICS : महायुतीतील लोकसभेच्या 9 जागांसाठी अजित पवार गट आग्रही; संभाव्य उमेदवारांची यादी समोर ?
बाळासाहेब ठाकरे ज्या मातोश्री बंगल्यात राहिले.तेच खरे बाळासाहेबांचे खरे जिवंत स्मारक आहे. ते जनतेसाठी कधी खुले करणार ? राम कदम म्हणाले, उद्धव ठाकरे सध्या राहायला मातोश्री 2 वर आहेत. जुन्या मातोश्री बंगल्यात बाळासाहेब अनेक वर्ष वास्तव्यास होते. अनेक धाडसी निर्णय ज्या बंगल्यात त्यांनी घेतले. दिवस रात्र त्यांचा ज्या स्थळी त्यांचा वावर होता. तेच खरे जिवंत स्मारक जनतेसाठी का खुले नाही ? असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे.
राम कदम पुढे म्हणाले, मातोश्री ही वास्तू खऱ्या अर्थाने देशभरातल्या जनतेसाठी प्रेरक आहे. त्यांनी वापरलेल्या वास्तूपासून त्यांचे ऑफिस, त्यांची राहण्याची खोली सर्वच काही अद्भूत प्रेरक आहे. ही वास्तू स्वर्गीय बाळासाहेबांचे खरे जिवंत स्मारक म्हणून जनतेसाठी कोणतीही सबब न देता उद्धवजी कधी खुली करणार ? स्वतःला राहण्यासाठी मातोश्री 2 झालाच आहे. ही भावना प्रत्येक बाळासाहेबांना मानणाऱ्यांची आहे. असे रामी कदम म्हणाले आहेत.