MAHARASHTRA POLITICS : सध्या सर्वच राजकीय पक्षांना आगामी लोकसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार AJIT PAWAR गटाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महायुतीमध्ये अजित पवार गट लोकसभेच्या 9 जागांसाठी आग्रही आहे.
अजित पवार गटातील संभाव्य उमेदवारांना मतदारसंघात चाचपणी करण्याची वरिष्ठांनी सुचना केल्याचेही सांगण्यात येत आहे. सध्या राष्ट्रवादीकडे असलेल्या चार जागांसह आणखी पाच जागांची मागणी अजित पवार गटाने केली आहे.
हे वाचलेत का ? Bank Employees Strike : नागरिकांनो बँकेचे कामं उरकून घ्या ! 13 दिवस बँका राहणार बंद
संभाव्य उमेदवारांची नावे :
▪️बारामती – सुनेत्रा पवार
▪️सातारा – रामराजे नाईक निंबाळकर
▪️रायगड – सुनिल तटकरे
▪️शिरूर – शिवाजीराव आढळराव पाटील
▪️दक्षिण मुंबई – काँग्रेसमधील बडा चेहरा
▪️परभणी- राजेश विटेकर
▪️भंडारा गोंदिया – प्रफुल्ल पटेल
▪️धाराशिव – राणा जगजितसिंह
▪️छत्रपती संभाजीनगर – सतीश चव्हाण