RESERVATION : छत्रपती संभाजीराजे, छत्रपती उदयनराजे यांच्या पाठोपाठ मनोज जरांगे यांनी आरक्षणाचा विषय चांगलाच उचलून धरला आहे. सकल मराठा समाजाने आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांना संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा दिला आहे.
त्यामुळे राज्य सरकारला चांगलाच घाम फुटला आहे.मराठा समाजाने राज्यातील अनेक नेत्यांच्या घरांची व कार्यालयाची तोडफोड केली आहे. अशातच आता महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्यांविरोधात FIR नोंदवण्यात आली आहे.
हे वाचलेत का ? मनोज जरांगेंच्या मागे कोण आहे? कोण बोलायला सांगत आहे ? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे जातीय तणाव होत आहेत ! राज ठाकरेंचा थेट हल्लाबोल
राठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरात ठिकठिकाणी दंगली, जाळपोळ होत आहेत. अनुसूचित जाती जमातीला, इतर मागासवर्गीयांना, विशेष मागास प्रवर्गाला आरक्षण आहे. मात्र मराठा समाजाला आरक्षण नसल्याने आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी आंदोलन करत आहेत.
मात्र महाराष्ट राज्यात कोणत्या जातीला किती टक्के आरक्षण आहे हे तुम्हाला माहित आहे का ? तर याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…
महाराष्ट्रात एकूण 52 टक्के आरक्षण दिले जात असले तरीसुद्धा आरक्षणाच्या यादीत EWS ला 10 टक्के आरक्षण दिले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात एकूण मिळून 62 टक्के आरक्षण नोकरी व शिक्षणात दिले जात आहे. त्यामुळे मराठा समाजाला राज्य सरकार किती टक्के आरक्षण देणार याकडे मराठा समाजासह सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
1) एससी : 13 टक्के
2) एसटी : 07 टक्के
3) ओबीसी : 19 टक्के
4) विमुक्त + भटक्या जाती (4 प्रवर्ग) : 11 टक्के
5) एसबीसी अ : 02 टक्के
6) एकूण आरक्षण : 52 टक्के
जाणून घेऊयात कोणत्या राज्यात किती टक्के आरक्षण आहे ?