मुंबई : अशातच टीम इंडिया यंदाच्या विश्वचषकात ICC World Cup 2023 जबरदस्त कामगिरी करत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनलच्या सामन्यातही टीम इंडियानं धडाकेबाज कामगिरी केली आहे. न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करून टीम इंडियानं फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. या विजयासाठी जितकी विराट कोहली Virat Kohali आणि श्रेयस अय्यरच्या शतकांची चर्चा होत आहे, तितकीच चर्चा मोहम्मद शामीच्या Mohammad Shami गोलंदाजीचीही चर्चा होत आहे. एकीकडे मोहम्मद शामीवर कौतुकाचा वर्षाव होत असताना आता एक धक्कादायक माहिती मुंबई पोलिसांनी Mumbai Police एक्सवर शेअर केली आहे. यामध्ये मोहम्मद शमी आणि टीम इंडिआयातील खेळाडूंवर चोरीचा गुन्हा दाखल होणार अशी माहिती समोर येते आहे.
तर घाबरू नका ! झाला असा आहे कि , दिल्ली पोलिसांनी सामन्यातील मोहम्मद शमीची कामगिरी पाहून कौइतुकाची थाप म्हणून पोलिसी भाषेत लिहिले आहे कि, “मुंबई पोलीस, आम्ही आशा करतो की, आज झालेल्या हल्ल्यासाठी तुम्ही मोहम्मद शामीला अटक करणार नाही.” या ट्वीटची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. नेमका काय आहे हे ट्विट पहा !
बर यावर मुंबई पोलिसांनी देखील भन्नाट उत्तर दिले आहे. याला उत्तर देताना मुंबई पोलिसांनीही ट्वीट केलं आहे कि, “दिल्ली पोलीस, तुम्ही असंख्य लोकांची मनं चोरण्यासाठी कलम लावायला विसरलात आणि तुम्ही सहआरोपींची यादीही दिली नाही.” या ट्विट मुळे आपले खेळाडू हे मैदानावरच नाही तर भारतातील सामान्यांपासून ,नेते, अभिनेते, पोलीस प्रशासन आणि भारतीयांच्या मनावर आपले देखील अधिराज्य गाजवतात हेच दिसून येते.
हे वाचलेत का ? India vs New Zealand : सामना पाहण्यासाठी अर्धे बॉलिवूड वानखेडेवर, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील लावली हजेरी