ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक २०२३ च्या पहिल्या उपांत्य फेरीत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामन्याची रंगात हळहळू वाढते आहे. भारतीय संघाने साखळी फेरीतील सर्व ९ सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज वानखेडे स्टेडियमवर वर्ल्ड कप 2023 चा पहिला सेमीफायनल सामना खेळला जात आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणे फेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. न्यूझीलंडनेही प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
भारत विरुद्ध न्यूझीलंड प्लेइंग ११
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड : डेव्हन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (कर्णधार), डार्ल मिशेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, टिम साऊदी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.