देशातील तेल विक्री करणाऱ्या कंपन्यांनी नेहमीप्रमाणे आज पहाटे इंधनाचे नवीन दर जारी केले आहेत. भारतामध्ये रोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर जारी केलं जातात. जून 2017 च्या आधी दर 15 दिवसांनी इंधनाच्या दरांमध्ये बदल केला जायचा.
महाराष्ट्रामध्ये पेट्रोल 79 पैशांनी तर डिझेल 76 पैसे प्रति लिटरने महाग झालं आहे. बिहारमध्ये पेट्रोलचे दर 52 तर डिझेचे दर 48 पैसे प्रति लिटरने वाढले आहेत. या शिवाय हिमाचल प्रदेश, झारखंड, पंजाब आणि तामिळनाडूमध्येही पेट्रोल तसेच डिझेलचे दर वाढल्याचं चित्र दिसत आहे. दुसरीकडे गुजरामध्ये पेट्रोल 38 पैसे प्रति लिटर आणि डिझेल 41 पैसे प्रति लिटरने स्वस्त झालं आहे. हरियाणामध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये घसरण झाली आहे.
4 महानगरांमधील इंधनाचे दर
– दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लीटर.
– मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लीटर.
– कोलकात्यामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लीटर.
– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.65 रुपये आणि डिझेल 94.25 रुपये प्रति लीटर.
नोएडामध्ये पेट्रोल 96.92 रुपये आणि डिझेल 90.08 रुपये प्रति लीटर, गाजियाबादमध्ये 96.58 रुपये आणि डिझेल 89.75 रुपये प्रति लीटर, लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लीटर, पटनामध्ये पेट्रोल 107.54 रुपये आणि डिझेल 94.32 रुपये प्रति लीटर, पोर्ट ब्लेयरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लीटर झालं आहे. या शहरांमधrn इंधनाच्या दरात वाढ झालेलं पाहायला मिळत आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर तुम्हाला एसएमएसद्वारेही कळू शकतात. इंडियन ऑइलचे ग्राहक 9224992249 या क्रमांकावर RSP आणि आपल्या शहराचा कोड टाइप करून माहिती मिळवू शकतात. BPCL ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आरएसपी आणि आपल्या शहराचा कोड लिहून एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तसेच HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड टाइप करून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.