पीएम किसान योजना : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हफ्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पण त्याआधी लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव तपासा. यासोबतच जर तुम्ही ईकेवायसी केलं नसेल तर, ते करणं आवश्यक आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा पंधरावा हफ्ता दिवाळीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचं सांगितलं जात होते. त्यामुळे देशभरातील शेतकरी आपल्या खात्यात पैसे जमा होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी 15 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
केंद्र सरकारकडून लवकरच पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 15 वा हप्ता जारी करण्यात येईल. किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणं अनिवार्य आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला सुरुवात केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. आतापर्यंत 14 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करून शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.