मुंबई : राज्यात मराठा आरक्षणावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना धमकीचा फोने आल्याची माहिती समोर येते आहे. या संदर्भात स्वतः विजय वडेट्टीवार यांनी माहिती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळवली आहे. सध्या विजय वडेट्टीवार यांना वाय प्लस सुरक्षा असून त्यात तीन जवान आणि एक गाडी अशी सुरक्षा व्यवस्था आहे. मात्र, सुरक्षिततेच्या कारणामुळे त्यात आणखी वाढ करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
विजय वडेट्टीवार यांनी नुकतंच केलेलं जरांगे पाटलांवरील वक्तव्य हे या धमकीचे कारण असू शकते. ” जरांगे पाटील यांना मराठा समाजाच्या भल्या पेक्ष्या स्वतःचा राजकीय फायदा करून घेण्याची मंशा असावी. मराठा तरुणांच्या फायद्यापेक्षा पाटील यांना राजकीय लोकांच्या अधिक भल्यासाठी आग्रही आहेत…!” असा आरोप वडेट्टीवार यांनी जरांगे पाटील यांच्यावर केला होता. शिवाय जरांगे पाटील मराठा तरुणांची दिशाभूल करत असून मराठा तरुणांनी अभ्यास करून आपला मार्ग ठरवाव, असा सल्ला देखील दिला होता. त्यामुळे यांच प्रकरणातून विजय वडेट्टीवार यांना धमकी येत नाहीये ना असा सवाल उपस्थित झाला आहे.









