मुंबई : काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याने एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री यांना तातडीने माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळ न दवडता व्यवस्था केली. त्यामुळे वेळेत उपचार मिळाल्याने एकनाथ खडसे यांचे प्राण वाचले.
सध्या एकनाथ खडसे यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान दिवाळीनिमित्त आणि तातडीने मदत पोहोचवल्यानेच प्राण वाचवल्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून भावनिक शब्दात आभार मानले आहेत.
यावेळी एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना फोन करून भावना व्यक्त करताना म्हटले आहे की, ” आपला छोटाच विषय होता. आपल्या दृष्टिकोनातून बहुदा फार मोठा नव्हता. मला एअर ॲम्बुलन्स मिळत नव्हती. एक मिळाली ती नाशिकला उभी होती. मात्र एटीसी क्लिअरंस मिळत नव्हता. तुम्ही बोलल्यामुळे मिळाला. मी रुग्णालयात आलो. ऑपरेशन थिएटरमध्ये मला नेलं तेव्हा एनजीओप्लास्टीचा निर्णय घेतला होता. दोन ब्लॉकेजेस १००% आणि तिसरा ७०% टक्के होता. परिस्थिती गंभीर होती. पण त्यांनी एनजीओ प्लास्टिक केली. ती व्यवस्थित पार पडली. माझं हृदय 100% बंद पडलं होतं. त्यावेळी दोन मिनिटांची शॉर्ट ट्रीटमेंट दिली. तुमचं विमान वेळेवर आलं नसतं तर माझं विमान टेकऑफ झालं असतं, आणि लँड झालं नसतं तुमचे आभार तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी आभार व्यक्त केले आहेत.