नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी सात सप्टेंबर 2022 ला भारत जोडो यात्रेला सुरुवात केली होती. ही यात्रा कन्याकुमारीपासून सात सप्टेंबरला सुरू झाली होती. तर तीस जानेवारीला जम्मू-काश्मीरमध्ये या यात्रेचा शेवट करण्यात आला होता. संपूर्ण यात्रेमध्ये देशातील अनेक नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांनी या यात्रेमध्ये सामील होऊन मोठा प्रतिसाद दिला होता. त्यामुळे आता राहुल गांधी पुन्हा एकदा भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने रस्त्यावर उतरून नेते पदाधिकारी आणि नागरिकांना साद घालणार आहेत अशी माहिती समोर येते आहे.
दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेससह विरोधी पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडीची स्थापना केली आहे भाजपला रोखण्यासाठी विवहरचना बनवली जात असून काँग्रेसने भारत जोडो यात्रा दोन सुरू करणार असल्याचे समजते आहे
भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा हा हायब्रीड असण्याची शक्यता आहे. अर्थात ही यात्रा काही भागात पायी आणि काही भागात वाहनातून प्रवास करणार आहे. निवडणुका संपल्यानंतर राहुल गांधी या यात्रेचा दुसरा टप्पा डिसेंबरमध्ये सुरू करणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समजते आहे.