मुंबई : बीडमधील हिंसाचार हा पूर्वनियोजित कट होता असे खळबळजनक विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. तरीही राज्याच्या गुप्तचर खात्याचे ते अपयश असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. जयदत्त क्षीरसागर हे फक्त ओबीसी समाजाचे असल्याने त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला असल्याचंही ते म्हणाले. ओबीसी समजामधून मराठा आरक्षणाला तीव्र विरोध असल्याच त्यांनी थेट शब्दात म्हंटले आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले कि, ” मी बीड आणि माजलगाव गेलो होतो. मी किंवा माझ्या पक्षाने आरक्षणाला विरोध केला नाही. आम्ही हे म्हणतो आहे की आमच्या आरक्षणाला धक्का न लावता द्या. ओबीसीमध्ये छोट्या जाती आहेत. त्यात मराठ्यांना काही मिळणार नाही. जी आमची भूमिका तीच शिंदे, शरद पवार, फडणवीस यांची आहे. हे आंदोलन सुरू झालं त्यात प्रचंड नासधूस केली. सुभाष राऊत यांच्या हॉटेलमध्ये सर्वात जास्त नुकसान झालं. आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावरील हल्यानंतर त्यावेळी मी सांगितले होते. की हॉटेलला संरक्षण द्या. सोळंके यांच्या घरातील हल्ल्यावेळी कोयते,पेट्रोल बॉम्ब सोबत होते.
जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर यांच्या घरातील हल्ल्यात घरचे सापडले तर वाचले नसते. प्रत्येकाला सांकेतिक नंबर दिला होता. हे ठरवून होतं, अचानक घडलं नव्हतं. या नेत्याला हा नंबर दिला होता. सोळंके बोलतात हे खरं आहे. आरक्षणाने सर्व प्रश्न सुटतील असं नाही, जे प्रकाश सोळंके म्हणाले त्यात गैर काय ? पोलीस हतबल का झाले याची चौकशी व्हावी. पोलिसांना माहिती नव्हती का, त्यांच्याकडे शस्त्र होतं, काठ्या होत्या, थोडा तरी प्रतिकार करायला हवा होता. असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.