Neuralink : न्यूरालिंक हे एका लहान संगणक चिपसारखे आहे, जे मानवी मेंदूमध्ये इम्लांट केले जाऊ शकते. जसे आपले मेंदू आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवण्यासाठी विद्युत सिग्नल वापरतात. त्याचप्रमाणे न्यूरालिंकची मेंदूची चिप आपले विचार आणि डिजिटल जग यांच्यातील ब्रिज म्हणून काम करणारे. या मंजुरीबाबत न्यूरालिंकने एक ट्विटही केले आहे. Neuralink ने सांगितले आहे की, FDA ची मान्यता ही एक महत्त्वाची पहिली पायरी आहे.(FDA approved Neuralink human trials) आमच्या या तंत्रज्ञानामुळे एक दिवस अनेक लोकांना मदत होईल.
We are excited to share that we have received the FDA’s approval to launch our first-in-human clinical study!
— Neuralink (@neuralink) May 25, 2023
This is the result of incredible work by the Neuralink team in close collaboration with the FDA and represents an important first step that will one day allow our…
न्यूरालिंकच्या चिपची चाचणी माकडांवर यशस्वी (Neuralink Monkey Trials)
एलॉन मस्कची कंपनी न्यूरालिंकला अमेरिकेच्या फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशनकडून (एफडीए) मानवांवर चाचणी करण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे. आता न्यूरालिंक मानवाच्या मेंदूमध्ये एक चिप टाकून मानवी चाचण्या घेण्यास सक्षम असेल. यापूर्वी न्यूरालिंकच्या चिपची चाचणी माकडांवर करण्यात आली असून ती यशस्वी झालीये. न्यूरालिंकचे हे ब्रेन इम्प्लांट तंत्रज्ञान अनेक प्रकारे अतिशय उपयुक्त ठरणारे. मेंदूमध्ये चिप टाकून अनेक रुग्णांना खूप मदत होऊ शकते. ही चाचणी यशस्वी झाल्यास अर्धांगवायूच्या रुग्णांशिवाय ज्यांना बोलता येत नाही, किंवा जे मानसिकदृष्ट्या सक्षम नाहीत त्यांच्यासाठी हे उपयोगी ठरेल. एलॉन मस्कला त्यांच्या तंत्रज्ञानावर इतका विश्वास आहे की, त्यांनी सांगितले होते की ते त्यांच्या मुलांच्या मेंदूमध्ये ही चिप बसवण्यास तयार आहेत.
FDA ला Neuralink सोबत एक मोठी समस्या आहे, ती म्हणजे चिपमधील लिथियम बॅटरी. FDA म्हणते की, ब्रेन चिपची बॅटरी कोणत्याही कारणाने लीक झाली तर त्याचे परिणाम भयंकर होऊ शकतात. न्यूरालिंकच्या चिपसोबत सर्वात मोठे आव्हान म्हणजे मेंदूच्या पेशी. न्यूरालिंकने या चिपची माकडांमध्ये यापूर्वी चाचणी केलीये. न्यूरालिंकने एक व्हिडिओ देखील शेअर केला होता, ज्यात दावा केला होता की माकडाच्या मेंदूमध्ये चिप बसवल्यानंतर ते संगणकावर गेम खेळू लागले. न्यूरालिंकच्या या चाचणीत कंपनीने माकडाला इजा तर केली नाही ना आणि मेंदूमध्ये चीप व्यवस्थित बसवली होती का, याचाही तपास सुरूये.
एलॉन मस्कला आपला मेंदू संगणकाशी का जोडायचा आहे?
एलॉन मस्कचा विश्वास आहे की, आपला मेंदू संगणकाशी जोडून आपण आपलं मन विस्तारू शकतो आणि मर्यादांवर मात करू शकतो. हे आपल्या बुद्धिमत्तेला पूर्णपणे नवीन पातळीवर नेण्यासारखे आहे. यामुळे तुम्ही गोष्टी जलद शिकू शकता, माहितीचा अॅक्सेस त्वरित मिळवू शकता आणि फक्त तुमचे विचार वापरून इतरांशी संवाद साधू शकता. एलॉन मस्क न्यूरालिंकसह अशा भविष्याची कल्पना करत आहे जिथे आपण आपल्या मेंदूची पूर्ण क्षमता अनलॉक करू शकतो. तसेच मानव आणि तंत्रज्ञान यांच्यात सिंबायेटीक रिलेशनशीप निर्माण करू शकतो. मस्कने एक्सिओसशी 2018 च्या मुलाखतीत सांगितले की, अल्गोरिदम आणि हार्डवेअर सुधारत असताना, डिजिटल बुद्धिमत्ता मोठ्या फरकाने जैविक बुद्धिमत्तेपेक्षा जास्त होईल.
मेंदूची चिप आपले विचार आणि डिजिटल जगाला कसे जोडते? (How does Neuralink work)
एका सोप्या प्रक्रियेद्वारे तुमच्या मेंदूमध्ये एक लहान चिप टाकतात. या चिपमध्ये इलेक्ट्रोड नावाचे छोटे भाग असतात, जे तुमच्या मेंदूच्या पेशींद्वारे बनवलेले विद्युत सिग्नल समजू शकतात. हे सिग्नल संदेशासारखे असतात, जे मेंदू संवाद साधण्यासाठी पाठवतो. त्यानंतर चिप हे संदेश वाचते आणि संगणकावर पाठवते. संगणक तुमच्या शरीराबाहेरील गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी संदेश वापरू शकतो किंवा तुम्हाला इतर लोकांशी बोलू देऊ शकतो, ज्यांचे मेंदू देखील Neuralink शी जोडलेले आहेत. असं वाटेल की, जणू तुमचा मेंदू आणि संगणक एकमेकांशी बोलत आहेत.