सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चिनी फोन निर्माता कंपनी विवोवर कडक कारवाई केली आहे. ईडीने लावा इंटरनॅशनल कंपनीचे एमडी आणि एका चिनी नागरिकासह 4 जणांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) अटक केली आहे.
https://x.com/ANI/status/1711683698771554768?s=20
ईडीकडून 10 लाखांची रोकड जप्त
10 ऑक्टोबर रोजी ईडीने आरोपींच्या घरावर छापे टाकून १० लाख रुपयांची रोकड जप्त केली होती. ईडीने अटक केलेल्यांमध्ये चिनी नागरिक ग्वांगवेन कियांग उर्फ अँड्र्यू कुआंग, लावा इंटरनॅशनलचे एमडी हरिओम राय, चार्टर्ड अकाउंटंट राजन मलिक आणि नितीन गर्ग यांचा समावेश आहे. ईडीने 3 फेब्रुवारी 2022 रोजी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता