तासगाव : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे. पाठीत खंजीर खुपसणारे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे आपला उरलेला पक्ष शोधत आहे अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे हे तासगाव येथे भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना म्हणाले की, ” देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना पाठित खंजीर खुपसण्याचा काम करणाऱ्या लोकांना घरी बसावं लागलं. बेईमानीचा बदला हा काळच घेत असतो. उद्धव ठाकरे यांची शिवसेना कुठे गेली हे ते शोधत आहेत. तर पक्ष कुठे कुठे राहिला यासाठी शरद पवार दिल्लीत बैठका घेत आहेत.
तसेच महायुतीत भाजपच मोठा भाऊ आहे. कुटुंब आणि आघाडीत मोठ्या भावाने एक पाऊल मागे घेणे ही पूर्वीपासूनच भाजपची भूमिका आहे. त्यात काहीच वावग नाही असे देखील यावेळी चंद्रशेखर बावनकुळे हे म्हणाले आहेत.