क्रिकेटच्या महापर्वाला 5 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार असून त्याच्या 1 दिवस आधीच ओपनिंग सेरेमनी असेल. यावेळी वर्ल्डकपमध्ये सहभागी 10 देशांचे कर्णधार एकत्र येणार आहेत. न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्ये वर्ल्डकपचा पहिला सामना रंगणार आहे. तसेच यंदाच्या वर्ल्डकपसाठी अधिकृत ब्रॉडकास्ट राईट घेतलेल्या स्टार स्पोर्ट्सने देखील कंबर कसली आहे. दरम्यान या वर्ल्डकपमध्ये एकूण 9 भाषांत कॉमेन्ट्रीचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे.
त्यासाठी तब्बल 120 कॉमेंटेटरची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. यात सुनील गावस्कर, रिकी पॉन्टिंग, इयॉन मॉर्गन, शेन वॉटसन आणि विकार युनूस यांच्यासारख्या दिग्ग्जचा समावेश करण्यात आला आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलगू, कन्नड, बंगाली, गुजराती आणि मल्याळम अशा एकूण 9 भाषांमध्ये वर्ल्डकपची कॉमेंट्री ऐकायला मिळणार आहे.