महाराष्ट्र : राज्य सरकारने तहसीलदार पद कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. तास जीआर देखील काढण्यात आला असून , सरळ सेवेतील कंत्राटी भरती नंतर तहसीलदार, नायब तहसीलदार, कारकून ही पद देखील कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत.
राज्यात शासकीय भरती रखडलेली आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता कंत्राटी कामगारांच्या भरतीचा जीआर काढला आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने ही जाहिरात काढली असून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी यावर आक्षेप घेतला आहे. या जीआरला सर्वच स्तरातून विरोध होत असताना शिंदे फडणवीस सरकारने पुन्हा एकदा तहसीलदार पदही कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतल्याने मोठी टिकेची जोड उठली आहे.