WhatsApp : मेटा प्लॅटफॉर्मने आपली कमाई वाढवण्यासाठी व्हाट्सअपवर जाहिरात दाखवण्याचा विचार सुरू केला आहे. जाहिरात मुक्त व्हाट्सअप वापरण्यासाठी आता शुल्क भरावे लागणार आहे. अशी माहिती समोर आली आहे. परंतु अशी अधिकृत माहिती मात्र प्रसारित करण्यात आलेली नाही.
दरम्यान कंपनी सध्या ॲप मधील जाहिराती दाखवण्याचा विचार करत नसून या आधीही व्हाट्सअप पेड करण्याचा मुद्दा अनेक वेळा समोर आला होता. तथापि भारत आणि ब्राझीलमध्ये व्हाट्सअप वापरकर्त्यांची संख्या अधिक आहे. परिणामी अशा अफवा येत असतात.
व्हाट्सअपवर जितके अधिक संभाषण होईल तितका जास्त महसूल मिळवता येईल. त्यामुळे या मॉडेल मधून पैसे कमावण्याच्या अनेक बातम्या आल्या असल्या तरीही व्हाट्सअपने मात्र या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे व्हाट्सअप वापरण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नसल्याचे व्हाट्सअपने सांगितले आहे.