नवी मुंबई : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाही. कॅनरा बँकेतील ५३८ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात विशेष पीएमएलए न्यायालयाने गुरुवारी बँकेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
नरेश गोयल आर्थर रोड तुरुंगातच राहणार
गोयल यांना दक्षिण मुंबईतील आर्थर रोड कारागृहात पाठवण्याची विनंतीही न्यायालयाने मान्य केली. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गोयल यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात केंद्रीय एजन्सीच्या कार्यालयात प्रदीर्घ चौकशीनंतर १ सप्टेंबर रोजी अटक केली होती.
गोयल यांना न्यायालयीन कोठडी
ईडीची कोठडी संपल्यानंतर नरेश गोयल यांना विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यासमोर हजर करण्यात आले. ईडीने आणखी कोठडीची मागणी न केल्याने न्यायालयाने गोयल यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नवी मुंबईतील तळोजा कारागृहाऐवजी भायखळा येथील आर्थर रोड कारागृहात हलविण्याची गोयल यांची विनंतीही न्यायालयाने मान्य केली.गोयल यांनी अर्जात आपण आरोग्याच्या अनेक समस्यांनी त्रस्त असल्याचे नमूद केले असून कौटुंबिक डॉक्टरांकडून तपासणी करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती केली आहे. त्यांची विनंती ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने सरकारी बाजूने उत्तर मागितले आहे.
538 कोटींचा घोटाळा प्रकरण
जेट एअरवेज, नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनिता गोयल यांच्याविरोधात सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरशी संबंधित आहे. या सर्वांवर कॅनरा बँकेची ५३८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.