WhatsApp आपल्या युजर्ससाठी सतत अनेक मोठे अपडेट्स देत असते. युजर्सची प्रायव्हसी लक्षात घेऊन कंपनी नवनवीन फीचर्स सादर करत असते. नव्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप थर्ड पार्टी चॅट इंटरऑपरेबिलिटी फीचरवर काम करत आहे.
लोकप्रिय व्हॉट्सअॅप WhatsApp बीटा ट्रॅकिंग वेबसाइट वाबेटाइन्फोने हा खुलासा केला आहे. मात्र हे नवे फीचर सध्या बीटा युजर्ससाठी उपलब्ध आहे. थर्ड पार्टी चॅट इंटरऑपरेबिलिटी फीचरच्या मदतीने युजर्स व्हॉट्सअॅपवर WhatsApp अकाऊंट तयार न करता व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करू शकतील.
WhatsApp व्हॉट्सअॅपवर लवकरच मिळणार थर्ड पार्टी चॅट सपोर्ट
व्हॉट्सअॅप लवकरच आपल्या युजर्ससाठी थर्ड पार्टी चॅट सपोर्ट देणार आहे. हे फीचर सध्या वापरण्यासाठी उपलब्ध नाही. हे फीचर लवकरच सर्वसामान्य युजर्ससाठी सादर करण्यात येणार आहे. व्हॉट्सअॅपकडे किमान युरोपियन प्रदेशात इंटरऑपरेबिलिटी सेवा प्रदान करण्यासाठी नवीन युरोपियन नियमांचे पालन करण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी आहे.
आता इंटरऑपरेबिलिटीचा अर्थही सांगतो. हे फीचर सुरू झाल्यानंतर ज्या युजर्सचे व्हॉट्सअॅप अकाऊंट नाही ते व्हॉट्सअॅपवर कुणाला मेसेज ही करू शकतात. म्हणजेच जे टेलिग्राम किंवा इतर चॅट प्लॅटफॉर्मशी जोडले जातील ते व्हॉट्सअॅप अकाऊंट तयार न करता त्यांच्या अॅपवरून व्हॉट्सअॅप युजर्सना मेसेज पाठवू शकतील.
आता नावाशिवाय व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करता येणार
डब्ल्यूएबीटाइन्फोच्या रिपोर्टनुसार, कंपनी कम्युनिटीसाठी एक नवीन फीचर सादर करणार आहे. मात्र, हे फीचर सध्या बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध आहे. या नव्या फीचरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला नवा ग्रुप तयार करावा लागेल. सद्यस्थितीत गटातील जास्तीत जास्त क्षमता अजूनही १०२४ जणांची आहे.