नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी राजधानी दिल्लीतील प्रगती मैदानावर बांधलेल्या नवीन कन्व्हेन्शन सेंटरचं उद्घाटन केलं. या नवीन ITPO कॉम्लेक्सला ‘भारत मंडपम’ असं नाव देण्यात आलं आहे. या IECC केंद्राला बांधण्यासाठी 2700 कोटी रुपये खर्च आलांय. पंतप्रधान मोदी यांनी सकाळी प्रांगणात वैदिक मंत्रोच्चारासह प्रार्थना केली. प्रार्थना केल्यानंतर, पंतप्रधानांनी कॉम्लेक्सच्या पुनर्विकासात योगदान देणाऱ्या कामगारांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी फोटो काढले. संध्याकाळी कॅम्पसमध्ये पोहोचल्यानंतर पंतप्रधानांनी उद्घाटन केलं. नवीन कॉम्लेक्सला ‘भारत मंडपम’ असं
नाव देण्यात आलं आहे.
शंखाच्या आकाराचे भारत मंडपम (Pragati Maidan Convention Centre)
प्रगती मैदान कॉम्लेक्सचा मध्यवर्ती बिंदू म्हणून हे अधिवेशन केंद्र विकसित करण्यात आले आहे. कॉम्प्लेक्समध्ये बहुउद्देशीय हॉल आणि प्लेनरी हॉलची एकत्रित क्षमता 7,000 आहे, जी ऑस्ट्रेलियातील सिडनी ऑपेरा हाऊसपेक्षा जास्त आहे. त्याच्या भव्य अॅम्फीथिएटरमध्ये 3,000 लोक बसू शकतात. शंखाच्या आकाराच्या भारत मंडपाचे उद्घाटन केल्यानंतर मोदी म्हणाले, हे एक मोठे व्यासपीठ बनेल आणि ती देशाची गरज होती. ते आधी बांधायला हवे होते. मात्र, ते थांबवण्याचे अनेक प्रयत्न झाले. चांगल्या कृतींना काही लोकांना थांबवण्याची सवय असते.
‘भारत मंडपम’साठी 2,700 कोटी रुपये खर्च केले
अधिकार्यांच्या मते, हे कॉम्प्लेक्स देशात आंतरराष्ट्रीय बैठका, परिषदा आणि प्रदर्शने आयोजित करण्यासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या पंतप्रधानांच्या दृष्टीवर आधारित आहे. हा प्रकल्प सुमारे 2,700 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आला आहे. सुमारे 123 एकर परिसरात पसरलेले हे कॉम्प्लेक्स देशातील सर्वात मोठे संमेलन आणि प्रदर्शन केंद्र म्हणून विकसित करण्यात आलं आहे.
अनेक अत्याधुनिक सुविधांचा समावेश
यावेळी पंतप्रधानांनी भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G-20 बैठकींवर दोन स्मरणार्थी नाणी आणि दोन टपाल तिकिटे जारी केली. इव्हेंटसाठी उपलब्ध जागेच्या बाबतीत हे कॉम्प्लेक्स जगातील शीर्ष प्रदर्शन आणि अधिवेशन केंद्रांपैकी एक आहे. यात कन्व्हेन्शन सेंटर, एक्झिबिशन हॉल आणि अॅम्फीथिएटरसह अनेक अत्याधुनिक सुविधांचा समावेश आहे.
भारतीय संस्कृतीची झलक
या केंद्रात सौरऊर्जेची ओळख, विश्वाच्या निर्मितीतील पाच मूलभूत तत्त्वे, शून्य ते चांद्रयान आणि लोककला यांचं चित्रण छतापासून ते अधिवेशन केंद्राच्या भिंतीपर्यंत करण्यात आलं आहे. मोठ्या जागतिक स्तरावरील परिषदा, शिखर परिषद, व्यवसाय शिखर परिषद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी IECC हे एक मोठे आणि योग्य ठिकाण म्हणून मानले जात आहे.