अहमदनगर : लोकसभा निवडणुका Lok Sabha Elections 2024 पार पडल्या आहेत. या निवडणुकीमध्ये भाजपला BJP मोठा पराभव पचवावा लागत आहे. संघानं लोकसभेमध्ये भाजपच्या या पराभवाला थेट अजित पवार यांना दोषी धरले आहे. एकीकडे या पराभवाचं खापर अजित पवार यांच्यावर फुटत असताना शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी देखील पवारांच्या संकटात पुन्हा वाढ होते आहे.
Maharashtra Politics : “अजित पवारांना महायुतीमध्ये घेतल्याने भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली ! ” संघाच्या नियतकालिकातून थेट टीका
पवारांच्या क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतला असून याचिका दाखल केली असल्याच माध्यमांमधून प्रसिद्ध केले जात असतानाच आता स्वतः अण्णा हजारे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ” मी कधी बोलत नाही. बोललो नाही मात्र माझं नाव आलं. मला धक्का बसला पंधरा वर्षांपूर्वी मी आवाज उठवला होता. पण आता या घटने सोबत माझा कुठलाही संबंध नाही. अजित पवारांना दिलेल्या क्लीन चीट संदर्भात ज्यांना माहिती आहे ते बोलतील. माझा याच्याशी कुठलाही संबंध नाही. असं ना हजारे म्हणाले आहेत.