मुंबई : लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रात भाजपला चांगलीच तोंडावर आपडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तीन इंजिन असलेलं सरकार आल्यामुळे लोकांच्या मनात मोठ्या प्रमाणावर संभ्रम आणि अविश्वासाची भावना निर्माण झाल्याचे चित्र महाराष्ट्रातून दिसून आलं. दरम्यान संघाने देखील आता भाजपच्या या भूमिकेवर थेट शब्दात टीका केली आहे.
संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर नियतकालिका मधून अजित पवार यांच्यावर थेट टीका करण्यात आली आहे. या नियतकालिकामध्ये लिहिण्यात आल आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महायुतीमध्ये घेतल्याने भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली.
यावर अजित पवार यांनी उत्तर देताना म्हटले की, ” मी विकासावर लक्ष केंद्रित केले. लोकशाहीमध्ये सर्वांना आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. तर आता या वक्तव्यावर महाविकास आघाडीतून देखील कडाडून टीका होत असल्याचं दिसून येते आहे. “
शरद पवार यांना भाजपच्याबाबत विचारण्यात आले असता शरद पवार म्हणाले की, ” त्यांचा अनुभव काय तो त्यांनी सांगितला पण त्यांना नेमकं एवढंच सांगायचं आहे की महाराष्ट्रातील जनतेने आमचा पराभव केला त्याची कारण अनेक आहेत. पण ती आता आम्ही बोलू इच्छित नाही. देशात होत असलेल्या सत्तेच्या गैरवापरासंबंधी या निवडणुकीतून लोकांनी जी भूमिका घेतली त्यामधून शहाणपणा शिकतील अशी अपेक्षा आहे. ” अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.