पुणे : पुण्यामध्ये Pune अल्पवयीन आरोपींन पोर्शे कारने Porshe Car Accident दोघा तरुणांना चिरडलं. या घटनेने पुण्याला अक्षरशः मोठा हादरा दिला आहे. सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये नाईटलाईफ कल्चर एवढे टोकाला केव्हा गेले हे कदाचित या शहराला समजून शकलो नाही. पुण्यातील या अपघात प्रकरणातील आता आमदाराच्या त्या दोघा चमच्यांना देखील अटक करण्यात आली आहे.
दरम्यान ज्या रात्री अपघात झाला त्या रात्री प्रमुख आरोपी वेदांत अग्रवाल आणि त्याचे दोन मित्र असे तिघा जणांचे ब्लड सॅम्पल बदलण्यात आले होते. या तिघांचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी त्या आमदाराचे दोन चमचे मध्यरात्री ससूनमध्ये पोहोचले त्यांनी डॉक्टर तावरे आणि हळनोर तसेच संबंधित शिपाई या तिघा जणांशी हे ब्लड सॅम्पल बदलण्याबाबत डील केली आणि त्यानंतर या तिघांच ब्लड सोबत मॅच होतील असे तीन ब्लड सॅम्पल जमवण्यात आले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये अर्थात कैद झाला आहे. म्हणूनच या दोघा जणांना पुणे पोलिसांनी मुंबईमधून अटक केली आहे. त्याचबरोबर ज्या तिघा जणांनी ब्लड सॅम्पल दिले आहेत. त्या तिघांचा देखील आता कसून तपास पुढे पोलीस करत आहेत.
दरम्यान या प्रकरणांमध्ये गुन्हे शाखा यांनी आमदाराचे हेच चमचे म्हणजेच अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड या दोघा जणांना पुणे पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. यावेळी त्यांना 10 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याचबरोबर लाडोबांच्या निरीक्षणगृहामध्ये देखील 18 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.