पुणे : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. एकंदरीत निकाल पाहता महाविकास आघाडीने महायुतीला चांगलीच टक्कर दिली आहे. अनेक महत्त्वाच्या जागा देखील भाजपने गमावल्या आहेत. दरम्यान निकाल जसजसे घोषित होऊ लागले तसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार SHARAD PAWAR गटाच्या कार्यकर्त्यांनी सिल्वर ओक बाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान नुकतीच जेष्ठ नेते शरद पवार यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन इंडिया आघाडीच्या पुढच्या दिशेबाबत वक्तव्य केल आहे.
या पत्रकार परिषदेमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महत्त्वाचं वक्तव्य करताना म्हटले आहे की, ” लोकसभा निवडणुकीचा निकाल आहे, हा निकाल परिवर्तनाला पोषक असा आहे. देशाच्या निकालात महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची दिसते. आमच्या पक्षाला चांगले यश मिळालं आहे. आम्ही जनतेची कृतज्ञता व्यक्त करतो. आमचा प्रयत्न राहणार आहे की देशात देखील चित्रं आशादायक आहे. उत्तर प्रदेशात देखील चांगला निकाल लागला आहे. यापूर्वी भाजपला जे यश मिळायचं त्यामध्ये मर्जिन मोठं असायचं. आता तसं चित्रं नाही. आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न केले. मी मल्लिकार्जुन खर्गे, सीताराम येचुरी यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. आज संध्याकाळी याबाबत निश्चित आम्हाला कळेल आणि त्यानंतर आम्ही दिल्लीला जाऊ.”
https://www.facebook.com/share/v/RcjJBSNYDbHbwJBw/?mibextid=w8EBqM
तसेच , ” आम्ही 7 जागांवर यश प्राप्त करू असं चित्रं आहे. 10 पैकी 7 जागा जिंकण मोठं आहे. आमचा स्ट्रइक रेट जास्त आहे. आम्ही महाविकस आघाडी केली त्यांना देखील यश चांगलं मिळालं. आम्ही जीवाभावाने काम करण्याची भूमीका घेतली त्यामुळं हे घडू शकलं. आम्ही तिघे देखील एकत्रित राहून आगामी निवडणुकीला समोर जाऊ” असे यावेळी शरद पवार म्हणाले आहेत.
Lok Sabha Election Breaking : आणि प्रतीक्षा संपली ! महाराष्ट्रातील निकाल जाहीर होण्यास सुरुवात; वाचा सर्वात वेगवान अपडेट