लोकसभा निवडणूक 2024 : लोकसभा निवडणूक 2024 Lok Sabha Election 2024 ही प्रचंड गाजली आहे. या लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र आणि देशांमध्ये पक्षांतर म्हणा किंवा पक्ष फोडाफोडी आणि जोडाजोडीच प्रचंड राजकारण झाल आहे. यामुळे एकीकडे मतदार राजा तर नाराज झालाच होता. पण त्यामुळे भाजपला BJP मोठा फटका सहन करावा लागतो की काय अशीच परिस्थिती सध्या दिसून येते आहे.
आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला देशभरात सुरुवात झाली आहे. सध्या परिस्थितीमध्ये भाजपच्या नेतृत्वातील एनडीए 291 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडी 233 जागांवर आघाडीवर आहे. हा फरक अनपेक्षित होता. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 400 पारचा नारा दिला असतानाच ते स्वतःच ज्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत त्या लोकसभा मतदारसंघातूनच मतदाता त्यांनी त्यांना नाराज केलं आहे.
” इसे ही ट्रेलर कहते है” ! वाराणसीत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांचा धक्का; ‘त्या’ ट्विटने पंतप्रधानांना डिवचले
महाराष्ट्र Maharashtra , उत्तर प्रदेश Uttar Pradesh , तेलंगणा Telangana , कर्नाटक Karnataka आणि हरियाणा Hariyana हे चार भाजपचे बालेकिल्ले समजले जातात. परंतु या पाचही बालेकिल्ल्यांमध्ये भाजपला मोठा धक्का सहन करावा लागताना दिसून येतो आहे. या निवडणुकीमध्ये भाजपने श्रीराम मंदिर आणि हिंदुत्वाचा अजेंडा पुढे केला परंतु जनमानसात मात्र काहीसा रोश यावेळी पाहायला मिळतो आहे. त्यामुळे मोदींची लाट ओसरली का अशी चर्चा जनमानसात पाहायला मिळते आहे.
Baramati Lok Sabha Results Update : बारामतीकरांचा कौल सुप्रिया सुळेंकडेच ! तब्बल 14000 मतांची आघाडी