डोंबिवली : डोंबिवलीमध्ये अनुदान कंपनीमध्ये Amudan Company झालेल्या स्फोटात 12 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत असून अमुदान कंपनीच्या परिसरामध्ये आणखी 20 पेक्षा जास्त मृतांचे अवशेष Death आढळून आले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढणार असल्याचे स्पष्ट आहे.
दरम्यान बारा जणांचा मृत्यू झाला असून आणखी नऊ जण बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेली आहे. या मृत अवशेषांपैकी आता प्रत्येक अवशेषाची डीएनए तपासणी DNA Test होऊन मृताची ओळख पटते का? याचा तपास केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
धक्कादायक म्हणजे अमुदान कंपनी अजून देखील धुमसत आहे. या स्फोटाच्या घटनेला आता नऊ दिवस उलटून गेली आहेत. तरी देखील आग पूर्णपणे शांत न झाल्याने ही आग पुन्हा भडकू शकते. अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही केमिकल कंपनी असल्यामुळे केमिकलचा साठा असल्याने पुन्हा स्फोट देखील होऊ शकतो.
दरम्यान या फोटोमध्ये आत्तापर्यंत ज्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत तर जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.