मुंबई : आज बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल लागला असून विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी हा निकाल पाहण्यासाठी एकच झुंबड उठवली आहे. दरम्यान पालक आणि विद्यार्थ्यांच्या या उत्सुकतेवर पाणी फिरले गेला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या पाचच मिनिटांमध्ये महाराष्ट्र बोर्डाची वेबसाईट क्रॅश झाली आहे.
आज दुपारी एक वाजता बारावी बोर्डाचा निकाल अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आला आहे. परंतु जसा हा निकाल जाहीर झाला तशी साईट डाऊन झाली आणि अवघ्या पाच मिनिटात साईट क्रॅश झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात येत आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी आज महत्त्वाची पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. यानुसार एच एस सी बोर्डाचा 93.37% निकाल लागला आहे.
12 वी निकाल कोकणचा सर्वात जास्त तर मुंबईचा सर्वात कमी
कोकण 97.51 टक्के (सर्वात जास्त)
नाशिक 94.71 टक्के
पुणे 94.44 टक्के
कोल्हापूर 94.24 टक्के
संभाजी नगर 94.08 टक्के
अमरावती 93 टक्के
लातूर 92.36
नागपूर 92.12 टक्के
मुंबई 91.95 (सर्वात कमी)
महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपणार आहे. कारण 12 वीचा निकाल दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांसह पालकांची धाकधूक वाढली आहे. विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी या अधिकृत वेबसाईटस चेक करता येणार आहे.