पुणे : नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणी आज अखेर 11 वर्षानंतर निकाल लागला आहे. दाभोळकर कुटुंबीयांनी तब्बल अकरा वर्ष लढा दिल्यानंतर अखेर प्रकरणातील दोन आरोपींना सश्रम जन्मठेपेची शिक्षा आज न्यायालयाने सुनावली आहे.
तब्बल 11 वर्षानंतर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील निकाल लागला असून आरोप सिद्ध न झाल्यामुळे तीन आरोपींना निर्दोष ठरवण्यात आल आहे. यामध्ये वीरेंद्र सिंह तावडेवर कट रचल्याचा आरोप होता. परंतु पुरावे न मिळवता आल्या कारणाने तावडे याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्याचबरोबर पुणावळेकर आणि भावे यांच्या विरोधात देखील आरोप सिद्ध न झाल्यामुळे या तिघा जणांना निर्दोष ठरविण्यात आले आहे. तर कळसकर आणि अंदुरे या दोघांच्या विरोधात ठोस पुरावे मिळाल्या कारणामुळे न्यायालयाने या दोघांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.