उन्नाव : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप खासदार साक्षी महाराज यांचे वादग्रस्त विधान सध्या चर्चेत आहे. देशभरातून त्यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटत आहेत. उन्नावचे खासदार साक्षी महाराज म्हणाले कि, ” भारतात मुस्लीम लोकसंख्येची वाढ लोकशाही राष्ट्रासाठी घातक ठरू शकते. ४ बायका आणि ४० मुले भारतात राहू नयेत.” असा त्यांनी म्हंटले आहे.
नेमकं काय म्हणाले खासदार डॉ. सच्चिदानंद हरी साक्षी महाराज
उन्नाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सच्चिदानंद हरी साक्षी महाराज म्हणाले की, “लोकसंख्येच्या आकडेवारीची बातमी वाचल्यापासून मी दुखावलो आहे. भारतात हिंदूंची लोकसंख्या कमी होणे चांगले नाही. देशाचा इतिहास साक्षी आहे की, देशात जेव्हा जेव्हा हिंदू कमी झाले, तेव्हा देशाची फाळणी झाली. भारतातील मुस्लिमांची वाढती लोकसंख्या लोकशाही राष्ट्रासाठी घातक ठरू शकते. सर्वोच्च न्यायालयानेही लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. इतिहासावर नजर टाकली तर देशाची फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानात हिंदू २३.५ टक्के होते, ते आता २.५ टक्क्यांवर आले आहेत. २१ टक्के हिंदू गेले कुठे? लोकसंख्या नियंत्रणासाठी समान कायदा व्हावा, असे मी फार पूर्वीपासून सांगत आलो आहे.
तसेच ४ बायका आणि ४० मुले भारतात राहू नयेत. सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा करावा, अशी माझी अपेक्षा आहे. असं देखील ते म्हणाले आहेत.