मुंबई : धर्मवीर चित्रपटांमध्ये आनंद दिघे यांच्या राजकीय कारकीर्द बाबत दाखवण्यात आले. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राजन विचारे या नेत्यांबद्दल देखील मोठे सीन दाखवण्यात आले आहे.
चित्रपटाचा भाग असला तरी वास्तव आयुष्यावर हा चित्रपट बनवण्यात आला होता. या चित्रपटानंतर आनंद दिघे यांच्याबाबत महाराष्ट्राचा आदर आणखीनच वाढला. त्याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत देखील अनेकांचा दृष्टिकोन बदलला. पण आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. लवकरच धर्मवीर या चित्रपटाचा दुसरा भाग येणार असून धर्मवीर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात सर्व खरंच समोर येईल. असं खुद्द एकनाथ शिंदेच म्हणाले आहेत.
‘The Marathi People Are Not Welcome Here’ : मराठी विरुद्ध गुजराती वाद चिघळणार ! मराठी उमेदवारांनी अर्ज करू नयेत…! महाराष्ट्रातच अशी जाहिरात ? रोहित पवार संतापले
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
“ चित्रपटात दाखवलं होतं की राजन विचारे हे स्वत:हून आले आणि त्यांनी राजीनामा दिला. पण हे सगळं खोटं आहे. दिघे साहेबांनी त्याला राजीनामा द्यायला सांगितला, तेव्हा त्याने तो दिला नव्हता. तो रघुनाथ मोरेंकडे गेला आणि म्हणाला, हे काय चालू आहे? माझं पद काढून घेतायत. मोरे साहेब खूप समजुतदार होते. ते म्हणाले की दिघेंनी काही निर्णय घेतला असेल तर तो जाणीवपूर्वक घेतला असेल. हा निर्णय विशिष्ट परिस्थितीत घेतला आहे. तू बिलकुल इथे तिथे काही बोलू नकोस. पण तो सगळं बोलला, दिघे साहेबांनाही बोलला. मला पद नकोच होतं. मी शेवटी साहेबांना सांगितलं की असं करू नका. तेव्हा साहेबांनी त्याला बोलावलं आणि त्यांच्या भाषेत आनंदाश्रमामधील आतल्या खोलीमध्ये समजावलं. हे करायला लागलं. आम्ही सिनेमात जे दाखवलं ते एवढं उलटं आणि एकदम चांगलं दाखवलं. पण तो चांगला नाही,”