मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections 2024 पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच नेते एकमेकांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करत आहेत. दोनच दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत Sanjay Raut यांनी शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या नाशिकमधील बड्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी गौप्यस्फोट करणार असा इशारा दिलाच होता. दरम्यान आज संजय राऊत यांनी तब्बल 800 कोटी रुपयांच्या भूसंपादन घोटाळ्याचा आरोप शिंदे फडणवीस सरकार वर केला आहे.
आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारवर घणाघाती आरोप केले आहेत. यावेळी संजय राऊत म्हणाले की , ” नाशिक महानगरपालिका हद्दीत नगरविकास खातेअंतर्गत भूसंपादन घोटाळा करण्यात आला आहे. नाशिकमधल्या आपल्या मर्जीतल्या बिल्डरांना भूसंपादनाच्या नावाखाली आठशे कोटी रुपयांची कशी खैरात केली. हे 800 कोटी रुपये बिल्डरांच्या माध्यमातून कोणाला गेले ? यासंदर्भात माझं काम चालू आहे, पुढील दोन दिवसांत याच उलगडा पुराव्यासह करणार. भूसंपादन घोटळ्याप्रकरणी मी रीतसर तक्रार करत आहे, नगर विकास खातं मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली आहे. मग, ते ठाकरे सरकारमध्ये असताना किंवा आतादेखील सर्व महानगरपालिका क्षेत्रामध्ये अशाप्रकारे घोटाळे होत आहेत. हा जो पैसा राजकारणामध्ये येत आहेत सध्या महाराष्ट्रात तो कोणत्या माध्यमातून येत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
यावेळी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर देखील घणाघाती आरोप केले आहे. ते म्हणाले कि, ” नाशिक महानगरपालिकेमध्ये एका व्यवहारात भूसंपादनात 800 कोटी रुपये गैरमार्गाने गोळा केले. हा जनतेचा पैसा आहे. हा पैसा मग शिवसेना फडणवीस गट यांच्याकडे कसा पोहोचत आहे हे मी दोन दिवसात तुमच्याकडे पुराव्यासहीत देणार असल्याचंही राऊत यांनी म्हटलं. नगर विकास खात्याचा घोटाळा झाला, सरकार कोणाचाही असेल पण नगर विकास मंत्री तेच होते आणि आजही तेच आहेत, ” असा निशाणा संजय राऊत यांनी मुख्यामंत्री एकनाथ शिंदेंवर साधला आहे.