नवी दिल्ली : इथेनॉल Ethanol निर्मितीवर बंदी घातल्याने साखर उत्पादकांमध्ये नाराजीचा सूर म्हटला होता. परंतु आता साखर उत्पादकांसाठी एक महत्त्वाची आणि चांगली बातमी आहे. केंद्र सरकारने इथेनॉल निर्मिती वरील बंदी हटवली आहे.
केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर सहा डिसेंबर 2023 ला बंदी घातली होती. ही बंदी आता केंद्र सरकारने मागं घेतली असून याचा तब्बल 700 कोटी रुपयांचा फायदा साखर उत्पादकांना होणार आहे.