पुणे : पुणे विद्यापीठातून एक मोठी घटना उघडकीस आली आहे. विद्यापीठातील कॅन्टीनमध्ये खराब झालेले आंबट अन्न दिल्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगलाच गोंधळ घातला आहे.
नेमकं काय घडलं
विद्यापीठातील कॅन्टीनमध्ये सोमवारी विद्यार्थ्यांना जे अन्न वाढलं गेलं ते आंबट लागत होतं. पोळी आणि भाजी आंबट लागल्या कारणाने अनेक विद्यार्थ्यांनी जेवण अर्धवट सोडलं तर काहींनी थेट जाब विचारला यातून वाद सुरू झाला.
हा वाद एवढा विकोपाला गेला की तुला पाहून घेईन मी लोकलचा आहे. अशी भाषा कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांनी केल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. अधिक तपास केला असता या पोळ्यांना बनवण्यासाठी वापरण्यात आलेली कणिक खराब होती. त्यामुळे त्या पोळ्या आंबट लागत होत्या अशी माहिती मिळते आहे.
दरम्यान या घटनेनंतर कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची काळजी घ्यावी विद्यार्थ्यांना उत्तम आणि पौष्टिक अन्न देण्याऐवजी विद्यार्थ्यांना जर धमकी दिली जात असेल तर ही बाब निंदनीय आहे. त्यामुळे संबंधित मेस चालक त्यांनी कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी तसेच विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा काम कोणी करत असेल आणि त्यांना धमकी देण्याचं काम कोणी करत असेल तर त्याचं तीव्र आंदोलनाच्या स्वरूपामध्ये उत्तर दिलं जाईल असा इशारा विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने दिला आहे.