सांगली : सांगलीतून एक मोठी बातमी समोर येते आहे. काँग्रेस सोबत बंड केलेले विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नसून लिफाफा या चिन्हावर ते अपक्ष निवडणूक लढवणार आहेत.
सांगलीमध्ये आता मशाल विरुद्ध विशाल अशी लढत होणार आहे. विशाल पाटील यांच्या मागे समर्थकांचा मोठा ताफा आहे. सांगलीतून विशाल पाटील हे इच्छुक होते. परंतु ही जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला दिली आहे दरम्यान काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंड पुकारून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
पाणी जपून वापरा ! महाराष्ट्रातील सावरखेडा गावात हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण, 200 फुट दरीमध्ये उतरून हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत
काँग्रेसला विशाल पाटील यांचं बंड शमवण्यात अपयशाला असून आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. परंतु विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. तर ते आता लिफाफा या चिन्हावर सांगलीतून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत.