परभणी : परभणीमध्ये Parbhani सध्या महाविकास आघाडी आणि रासपचे महादेव जानकर Mahadev Jankar यांच्यामध्ये जबरदस्त शाब्दिक राजकारण सुरू आहे. महाविकास आघाडीचे परभणी लोकसभा मतदार संघाचे Parbhani Lok Sabha constituency उमेदवार संजय जाधव Sanjay Jadhav यांनी रासपच्या महादेव जानकर यांच्यावर कडाडून टीका केली आहे.
संजय जाधव यांनी टीका करताना म्हटले आहे की, ” 26 एप्रिल नंतर महादेव जानकर हे रेल्वे स्थानकावर झोपतील. तर आमदार रत्नाकर गुट्टे हे तुरुंगात जातील. जानकर यांना परभणीतून उमेदवारी देताना त्यांना एका विशिष्ट जातीचे लेबल लावून पाठवले आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजप मराठा आणि ओबीसी असे ध्रुवीकरण करून लढत आहे.” असा थेट आरोप संजय जाधव यांनी यावेळी केला.
तसेच ते म्हणाले कि, ” पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की मी ओबीसी, फडणवीस म्हणतात आमचा डीएनए ओबीसी.. यांनी असं म्हटल्यावर सर्वसामान्य इतर लोकांनी कुणाकडे बघायचं ? अरे माझा विजय त्याच दिवशी झाला ज्या दिवशी मोदींची सभा परभणीत झाली. 26 एप्रिल नंतर एक जण रेल्वे स्टेशनवर तर एक जण तुरुंगामध्ये झोपणार. ” अशी घनाघाती टीका यावेळी संजय जाधव यांनी केली आहे.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत देखील थेट वक्तव्य केल आहे. परभणीतील अक्षदा मंगल कार्यालयात शहरातील डॉक्टरांशी संवाद साधत असताना ते म्हणाले की, ” काही जण मोदी मोदी करतात. पण त्यांना सांगेल की परभणीचा मोदी आम्हीच आहोत. उद्या तुमच्यावर काही वेळ आली तर आम्हीच तुमच्यासाठी धावून येणार आहोत. मोदी मदत करायला येणार नाहीत हे लक्षात घ्यावे असं त्यांनी म्हटले आहे.