महाराष्ट्र : महाराष्ट्रातील आज लोकसभा निवडणुकीसाठीच्या पाच मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. यामध्ये रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूरमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये सरासरी 54.85% मतदान झाले आहे.
Lok Sabha Election 2024 : धाराशिवमध्ये महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन VIDEO
19 एप्रिल रोजी आज लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील पहिला टप्पा पार पडला आहे. मतदात्यांनी सकाळी सात वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर हजेरी लावली. उन्हाच्या तडाख्या आधीच मतदानाचा बराचसा टप्पा पार पडला होता. दरम्यान रामटेकमध्ये 52.38% मतदान पार पडले आहे. त्यासह नागपूरमध्ये 47.91%, भंडारा गोंदिया मध्ये 56.87%, गडचिरोली चिमूरमध्ये 64.95% आणि चंद्रपूर मध्ये 55.11% मतदान झाले आहे.
लोकसभा निवडणुकीचा आज मतदानाचा पहिला टप्पा महाराष्ट्रामध्ये पार पडतो आहे. यामध्ये पाच लोकसभा मतदारसंघांचा मतदानाचा टप्पा पार पडला आहे. देशातील 102 जागांवर हे मतदान पार पडले आहे. तर महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात आज मतप्रक्रिया पार पडली आहे. 21 राज्यांमध्ये 102 मतदार संघात 1625 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.