मुंबई : प्रसिद्ध अभिनेता सलमान खान यांच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर रविवारी 14 एप्रिलला पहाटे पाचच्या सुमारास दोघा हल्लेखोरांनी गोळीबार केला. अपारमेंटच्या दिशेने तीन राऊंड फायर करण्यात आले. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान या प्रकरणातील दोन्हीही प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली असून या कटाच्या मागे लॉरेन्स बिश्नोईचा खास शूटर विशाल उर्फ कालू हा असल्याचा समजत आहे. त्याला गुजरातच्या भुज मधून आज अटक करण्यात आली.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता सलमान खान याची राहत्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी ते म्हणाले की, ” या घटनेमागे कोण आहे त्याची पाळेमुळे खणून काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जे या कटात सहभागी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगून सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची असल्यास देखील त्यांनी म्हटलं आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची सूत्र वेगाने फिरवली. आज या प्रकरणातील प्रमुख आरोपी विशालला अटक करण्यात आली आहे. गुजरातमधील भुज मधून या हल्लेखोरांना अटक करण्यात आली. विशाल उर्फ कालू हा लॉरेन्स बिश्नोई गॅंग मधील शूटर असल्याची माहिती मिळते आहे. आरोपी हा मूळ गुडगावचा रहिवासी असून तो राजस्थानमधील गोदारा नावाच्या एका गुंडासाठी काम करतो. धक्कादायक म्हणजे मुसावाला हत्याकांडातील हा एक प्रमुख आरोपी आहे. त्याचबरोबर अनेक इतर हत्या आणि दरोड्याचे देखील त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अनेक दिवसांपासून हे आरोपी सलमान खानच्या घराची रेकी करत होते. दरम्यान ही घटना घडली तेव्हा अभिनेता सलमान खान आणि त्याचा कुटुंबीय घरीच होतं. अचानक रविवारी पहाटे पाचच्या सुमारास दोघा आरोपींनी हवेत गोळीबार केला. या आरोपींनी गॅलेक्सी अपार्टमेंटच्या दिशेने तीन फायरी झाडल्या आहेत. हा हल्ला सलमान खान याला जखमी करण्याच्या उद्देशाने नाही तर दहशत निर्माण करण्यासाठी होता. अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.